डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत १२ सामन्यांत फक्त ४ विजयांसह तळाला आहे. डग आऊटमध्ये सौरव गांगुली व रिकी पाँटिंग असे दोन दिग्गज खेळाडू मार्गदर्शन करण्यासाठी असूनही DCची ही अवस्था पाहून भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने पुढील हंगामासाठी काही बदल सूचवले आहेत.
आणखी एक निराशाजनक हंगाम संपत असताना, पठाणचे असे मत आहे की भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, जो सध्या दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक आहे, त्याने रिकी पाँटिंगच्या जागी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण भारतीय खेळाडूंच्या मानसशास्त्राचे त्याचे ज्ञान ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारापेक्षा चांगले आहे. "दिल्ली डगआऊटमध्ये सौरव गांगुलीची उपस्थिती, ही मोठी गोष्ट आहे. मला वाटते की गांगुलीला प्रशिक्षकपदाची जबाबदारीही दिली तर ते या संघात मोठा बदल घडवू शकतात," असे पठाणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
मुंबईला हव्या होत्या ११ धावा, लखनौच्या मालकांनी सुरू केला देवाचा धावा; कॅमेऱ्यानं सगळंच टिपलं!
IPL 2023 Play Offs Scenario : मुंबई इंडियन्सचे स्थान डगमगले; MIला बाहेर फेकण्यासाठी दोन संघ सरसावले
"सौरवला भारतीय खेळाडूंच्या मानसशास्त्राचे ज्ञान आहे. त्यांना ड्रेसिंग रूममध्ये वातावरण कसे ठेवायचे हे माहित आहे आणि दिल्लीने त्याचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. नाणेफेकीच्या वेळी वॉर्नरने सांगितले की, त्याचा संघ आता पुढच्या हंगामासाठी तयारीला लागला आहे, आणि या संदर्भात, गांगुलीला बदललेल्या भूमिकेत पाहणे चुकीचे ठरणार नाही." असेही तो म्हणाला. दिल्लीचा सामना बुधवारी पंजाब किंग्जशी होईल, त्यानंतर त्यांचा हंगामातील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
Web Title: Sourav Ganguly Replace Ricky Ponting As Delhi Capitals Coach For IPL 2024, Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.