Join us  

पाकच्या रमीज राजांनी BCCIबाबत केलं मोठं विधान, आता सौरव गांगुलीनं दिलं खणखणीत प्रत्युत्तर...

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:56 AM

Open in App

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारतीय संघ मजबूत असून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये असा जबरदस्त सामना होणं खूप रोमांचक असतं, असं म्हटलं आहे. सौरव गांगुली एका हिंदी वृत्त वाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होता.

वर्ल्डकपमध्ये याआधीही भारत-पाक सामन्याने सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही काही पहिलीच वेळ नाही. सामना इतका कठीण नसतो. कारण मी जेव्हा खेळत होतो तेव्हा मला कोणताही दबाव जाणवला नव्हता, असं म्हणत गांगुलीनं भारत-पाक सामन्याचं खेळाडूंनी कोणतंच टेन्शन घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं. पाकिस्तान क्रिकेड बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांनी बीसीसीआयबाबत केलेल्या विधानावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 

"क्रिकेट कधीच संपुष्टात येऊ शकत नाही. आमचा संघ आणि खेळाडू खूप चांगले आहेत. संपूर्ण जगात चांगलं क्रिकेट खेळलं जावं अशी आमची इच्छा आहे. क्रिकेट तेव्हाच चांगलं होईल जेव्हा भारत-पाकिस्तानसह सर्वच देश खूप चांगलं क्रिकेट खेळतील", असं सौरव गांगुली म्हणाला. 

भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आसीसीला खूप पैसा मिळतो. आयसीसीला एकूण मिळकतीपैकी ९० टक्के कमाई तर भारतातूनच होते. त्यामुळे भारताचा आयसीसीमध्ये दबदबा आहे. भारतानं जर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं थांबवलं तर खूप मोठं नुकसान होईल, असं विधान रमीज राजा यांनी केलं होतं. 

भारतातील क्रिकेटची आर्थिक भरभराट ज्यापद्धतीनं क्रिकेटची सुत्र हाताळत आहे आणि उद्या जर भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तान क्रिकेटला निधी द्यायचा नाही अशी भूमिका घेतली, तर सारंकाही कोलमडून पडेल, असंही रमीज राजा म्हणाले होते. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बीसीसीआयसौरभ गांगुलीऑफ द फिल्ड
Open in App