Join us  

सौरव गांगुलीचं ठरलंय... BCCIच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सर्वप्रथम करणार 'हे' काम!

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाला आहे. अध्यक्ष ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:41 AM

Open in App

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी रविवारी मुंबईती झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत अनेक नाट्यमय घडामोडींनंतर गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर गांगुलीच्या नावाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपद मिळल्याचा आनंद व्यक्त करताना सूत्रे हाती घेताच एक प्रमुख काम करणार असल्याचे गांगुलीनं सोमवारी स्पष्ट केले.

बीसीसीआयची सध्याची प्रतीमा ही तितकीशी चांगील नाही, त्यामुळे सर्वप्रथम ती सुधारण्याचं काम करणार असल्याचे गांगुलीनं सांगितले. तो म्हणाला,''देशासाठी खेळलो आणि नेतृत्वही केलं, त्यामुळे ही नवीन जबाबदारी स्वीकारताना आनंद होत आहे. पण, मागील तीन वर्षांत बीसीसीआयची अवस्था बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीत माझ्याकडे अध्यक्षपद आले आहे. बीसीसीआयच्या प्रतिमेला तडा गेलेला आहे आणि ती सुधारण्याची संधी मला मिळाली आहे.''

47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. तो म्हणाला,''प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याचे पहिले लक्ष्य असेल. त्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मी गेली तीन वर्ष प्रशासकिय समितीकडे याबाबत मागणी करत आहे, परंतु त्यांच्याकडून काणाडोळा केला गेला. त्यामुळे आता तो मुद्दा निकाली लावण्याचे पहिले ध्येय आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंचा आर्थिक प्रश्न सोडवायचा आहे.''   

नाट्यमय घडामोडींनंतर बीसीसीआय अध्यक्षपदी गांगुली, जाणून घ्या इनसाइड स्टोरीजगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौगर गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले.

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. मात्र अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.  

 

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय