नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 13 वर्षांआधी 2005 मध्ये तत्कालीन कोच ग्रेग चॅपेल यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत एक खुलासा केला आहे. या वादानंतर सौरवला कर्णधारपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर राहुल द्रविडकडे टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.
या संपूर्ण प्रकरणावर गांगुलीने एका चॅनेलवर माहिती दिली की, 'मला नाही वाटत की, यात द्रविडची कोणतीही भूमिका राहिली असेल. असं होत असतं की, जेव्हा कोच काही सांगतो ते कर्णधाराला ऐकावं लागतं. माझं राहुलसोबत अनेकदा बोलणं झालं होतं आणि त्याने तू परत येशील असेही अनेकदा म्हटले होते. पण एक गोष्ट स्पष्ट होतं की, कोच माझ्या विरोधात होते'.
हा वाद झाल्यानंतर गांगुलीला नोव्हेंबर 2005 मध्ये टीममधून बाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर पुढील एक वर्षातच त्याला टेस्ट टीममधूनही बाहेर व्हावं लागलं होतं. यावेळी ग्रेग चॅपेलवर जोरदार टीका झाली होती.
दरम्यान, गांगुलीने 2006 मध्ये शेवटी शेवटी टीममध्ये वापसी केली होती. त्यानंतर 2007 च्या वर्ल्ड कपमध्येही तो होता. यावर गांगुली म्हणाला की, 'मला विश्वास बसत नव्हता. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की, प्रत्येक सामन्यात तुम्हाला करा किंवा मरा या स्तरावर संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थीतीचा सामना करण्याचा मला अनुभव होता. पण कोणत्याही नव्या खेळाडूसाठी हे नवीन नसतं'.