भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला शनिवारी सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, गांगुलीच्या प्रकृती बिघडण्यावरून राजकारण तापू लागले आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) वरिष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनी मोठं विधान केलं आहे.
सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी प्रचंड दबाव असल्याचा दावा भट्टाचार्य यांनी केला. भारताचा माजी कर्णधार भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यंदा एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभेची निवडणूक प्रस्तावित आहे. गांगुली राजकारणात येणार अशी चर्चा असताना त्याच्यावर हा आघात झाला. गांगुली भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असाही तर्क लावला जात आहे. गांगुलींनं मात्र राजकारणात प्रवेशाचे अद्याप संकेत दिलेले नाहीत. काही दिवसांआधी त्यानं बंगालच्या राज्यपालांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट होती, असे नंतर खुद्द गांगुलीनेच स्पष्ट केले होते.
भट्टाचार्य म्हणाले,''गांगुलीचा राजकारणासाठी वापर करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत. त्यामुळेच कदाचित त्याच्यावर प्रचंड दबाव असावा. तो राजकिय घटक नाही. त्याला जग क्रिकेटपटू म्हणून ओळखतं. राजकारणात येण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकायला नको. तू राजकारणात येऊ नकोस, असे मी त्याला मागील आठवड्यात सांगितले आणि त्यांनी माझ्या मताला विरोध केला नाही.'' भट्टाचार्य हे गांगुलीचे फार जूने मित्र आहेत आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची भेटही घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, प्रकृतीबाबत केली विचारणा!
भट्टाचार्य यांच्या विधानावर भाजपाचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली की, आजारी विचारसरणी मुळे काही लोकं प्रत्येक गोष्टीत राजकारणच पाहतात. सौरवच्या कोट्यवधी चाहत्यांप्रमाणे आम्हीही त्याच्या प्रकृतीसुधारणेसाठी प्रार्थना करतोय.'' तृणमूल काँग्रेसचे नेते व राज्यमंत्री शोबानदेब चॅटर्जी यांनीही गांगुलीची भेट घेतली. गांगुलीच्या संघातील माजी सहकारी लक्ष्मी रतन शुक्ला हे राज्य मंत्री आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Web Title: 'Sourav Ganguly Under Pressure to Join Politics' - CPI(M) Leader Makes Controversial Comment
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.