भारतीय संघ अनोख्या पद्धतीने करणार बीसीसीआयचे अध्यक्ष बनणाऱ्या सौरव गांगुलीचे स्वागत

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 07:20 PM2019-10-21T19:20:07+5:302019-10-21T19:20:50+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly welcomes BCCI president to perform Indian team in unique way | भारतीय संघ अनोख्या पद्धतीने करणार बीसीसीआयचे अध्यक्ष बनणाऱ्या सौरव गांगुलीचे स्वागत

भारतीय संघ अनोख्या पद्धतीने करणार बीसीसीआयचे अध्यक्ष बनणाऱ्या सौरव गांगुलीचे स्वागत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

काही तासांमध्येच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनणार आहे. पण गांगुलीने अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वीच भारतीय संघाने त्याचे स्वागत अनोख्या पद्धतीने करायचे ठरवले आहे. 

आक्रमक नेतृत्वाने क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी करणारा सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली होती.

जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले. 

भारतीय संघ नेमका काय करणार आहे, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर कसोटी मालिका खेळत आहे. भारताने कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ मंगळवारी तिसराही सामना जिंकेल, असे म्हटले आहे. गांगुली 23 ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार आहे. पण त्यापूर्वीच त्याला भारतीय संघ मालिका विजयाची भेट देऊन दमदार स्वागत करणार आहे.


बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.

Web Title: Sourav Ganguly welcomes BCCI president to perform Indian team in unique way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.