Sourav Ganguly vs BJP : सौरव गांगुलीनं भाजपात प्रवेश करण्यास दिला नकार, म्हणून गमावले BCCI अध्यक्षपद; राजकारण तापले

Sourav Ganguly vs BJP : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला BCCI च्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म न देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:06 PM2022-10-12T12:06:42+5:302022-10-12T12:08:47+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly will not get a second term as the president of BCCI;  Trinamool Congress (TMC) targeted the BJP and accused it of acting in “political vendetta” against Dada | Sourav Ganguly vs BJP : सौरव गांगुलीनं भाजपात प्रवेश करण्यास दिला नकार, म्हणून गमावले BCCI अध्यक्षपद; राजकारण तापले

Sourav Ganguly vs BJP : सौरव गांगुलीनं भाजपात प्रवेश करण्यास दिला नकार, म्हणून गमावले BCCI अध्यक्षपद; राजकारण तापले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sourav Ganguly vs BJP : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला BCCI च्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म न देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे BCCI चे नवे अध्यक्ष असणार आहेत. देशाचे गृह मंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे BCCIच्या सचिवपदी कायम राहणार आहेत. आता याच मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे. तृणमुल काँग्रेसने ( TMC) सौरव गांगुलीने भाजपात प्रवेश नाकारल्यामुळे त्याला BCCI च्या अध्यक्षपदावरून बाजूला केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाकडून पश्चिम बंगालच्या स्टार खेळाडूचा राजकीय बळी दिल्याचाही आरोप केला जातोय. 

मोठा खेळ झाला? Sourav Gangulyला अध्यक्षपदावर राहायचं होतं कायम, IPL चेअरमनपदाची दिलेली ऑफर, पण...

''राजकिय सूडाचे हे ताजे उदाहरण आहे. अमित शाह यांचे पूत्र जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी कायम राहतात, परंतु सौरव गांगुलीला पुन्ही संधी दिली जात नाही. कारण, तो ममना बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहे आणि त्याने भाजपात प्रवेश करण्यास नकार दिला. आम्ही तुझ्यासोबत आहोत, दादा!,''असे तृणमुल काँग्रेसचे राज्यसभा खासदार संतून सेन यांनी ट्विट केले आहे. 

BCCI Elections : तिजोरीच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती; Sourav Ganguly अध्यक्षपदावरून हटणार, Jay Shah सचिवपदी कायम 


 
या वर्षी मे महिन्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गांगुलीच्या कोलकाता येथील घरात भेट घेतली होती. त्यांच्यासह राज्यातील अन्य भाजपा नेतेही होते. पुढच्याच दिवशी गांगुलीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्याच्या जवळच्या व्यक्तिंपैकी एक असल्याचे विधान केले. त्यानंतर गांगुलीने बॅनर्जी यांची भेटही घेतली.

तृणमुल काँग्रेसच्या या आरोपांवर भाजपाकडूनही उत्तर आलेय... भाजपा खासदाज लॉकेट चॅटर्जी यांनी म्हटले की,सौरव गांगुलीवर टीका करणाऱ्यांनी स्वतः आरशात पहावे. याचा अमित शाह यांच्या भेटीशी किंवा राजकारणाशी काही संबंध नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Sourav Ganguly will not get a second term as the president of BCCI;  Trinamool Congress (TMC) targeted the BJP and accused it of acting in “political vendetta” against Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.