Sourav Ganguly vs BJP : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला BCCI च्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म न देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे BCCI चे नवे अध्यक्ष असणार आहेत. देशाचे गृह मंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे BCCIच्या सचिवपदी कायम राहणार आहेत. आता याच मुद्यावरून राजकारण तापू लागले आहे. तृणमुल काँग्रेसने ( TMC) सौरव गांगुलीने भाजपात प्रवेश नाकारल्यामुळे त्याला BCCI च्या अध्यक्षपदावरून बाजूला केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाकडून पश्चिम बंगालच्या स्टार खेळाडूचा राजकीय बळी दिल्याचाही आरोप केला जातोय.
मोठा खेळ झाला? Sourav Gangulyला अध्यक्षपदावर राहायचं होतं कायम, IPL चेअरमनपदाची दिलेली ऑफर, पण...
''राजकिय सूडाचे हे ताजे उदाहरण आहे. अमित शाह यांचे पूत्र जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी कायम राहतात, परंतु सौरव गांगुलीला पुन्ही संधी दिली जात नाही. कारण, तो ममना बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहे आणि त्याने भाजपात प्रवेश करण्यास नकार दिला. आम्ही तुझ्यासोबत आहोत, दादा!,''असे तृणमुल काँग्रेसचे राज्यसभा खासदार संतून सेन यांनी ट्विट केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"