Join us  

Sourav Ganguly:तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार 'दादागिरी'; पाहा फोटो 

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 1:23 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI)अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत. मैदानात जवळपास १० वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर 'दादागिरी' पाहायला मिळणार आहे. सौरव गांगुली लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) एक खास सामना खेळणार आहेत. या सामन्याच्या तयारीसाठी दादा अनेक तास जिममध्ये घाम गाळत आहेत. 

सौरव गागुंली यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून तयारीची झलक दाखवली आहे. पोस्टद्वारे त्यांनी स्वत: माहिती दिली की ते लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. या फोटोंमध्ये गागुंली जिममध्ये एक्सरसाइज करताना दिसत आहेत. त्यांनी पोस्ट करत म्हटले की, "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धर्मादाय निधी उभारण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर लवकरच परतणार आहे. त्यासाठी जिममध्ये प्रशिक्षणाचा आनंद घेत आहे आणि लवकरच लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे", असे कॅप्शन लिहून दादांनी मैदानावर परतणार असल्याचे स्पष्ट केले.

 

भारतात होणार LLCचा पुढील हंगामलिजेंड्स लीग क्रिकेटचा आगामी हंगाम भारतात होणार असल्याची घोषणा आधीच करण्यात आली होती. एलएलसीचे सीईओ आणि सह संस्थापक रहम रहेजा यांनी गांगुलींचे आभार मानले आहेत. "आम्ही दिग्गज सौरव गांगुली यांना अन्य दिग्गजांसोबत खेळण्यासाठी धन्यवाद देत आहोत. एका वेळचे लीजेंड, नेहमी एक लीजेंड, दादा नेहमी क्रिकेटसाठीच असतात. ते एका धर्मादाय निधीसाठी सामना खेळणार आहेत, जो आमच्या प्रेक्षकांसाठी आनंदाचा क्षण असेल. आम्ही दादांची चांगली फलंदाजी पाहण्यास उत्सुक आहोत", असे एलएलसीचे सीईओ यांनी म्हटले. 

२०१२ नंतर पहिल्यांदाच खेळणार सौरव गांगुली यांनी आपला शेवटचा सामना २०१२ मध्ये आयपीएलच्या पुणे वॉरियर्स संघाकडून खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २००९ साली निवृत्त झालेल्या दादांचा चाहता वर्ग मोठा आहे. गांगुलींनी ५ वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. २००३ च्या विश्वचषकात सौरव गांगुलींच्या नेतृत्वात भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. तर गांगुलींनी १९९६ मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसौरभ गांगुलीबीसीसीआयइन्स्टाग्राम
Open in App