(गेमप्लान)भारत ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सामोरा जात आहे. अद्याप दोन सामने शिल्लक असल्याने मालिका विजयाची २-१ अशी शक्यता कायम आहे. याआधीही अनेक संघ अशाप्रकरच्या स्थितीतून बाहेर पडून मालिका जिंकले आहेत. चार धावांवर तीन गडी गमविल्यानंतर २५० वर धावा काढणे भारतासाठी वाईट नाही. त्यात रोहितची बॅट तळपली. गेली तीन वर्षे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो शानदार खेळ करीत आहे. दुसºया टोकाहून सलग गडी बाद होत असताना सिडनीत त्याने धावा ठोकल्या हे त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यातही धावगती कायम राखून तो खेळला. रोहितचा अपवाद वगळता शिखर आणि विराटसारखे खेळाडू ‘विनावॉर्मअप’ने मालिकेला सामोरे जात आहेत. त्यांना लय मिळविण्यासाठी थोडा वेळ लागेलच.
आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर ३०० हून अधिक धावा उभारायला हव्या होत्या. एकदिवसीय प्रकारात हा संघ तुल्यबळ वाटतो. संघासाठी ही परिवर्तनाची वेळ आहे. अशा चक्रातून प्रत्येक संघाला जावेच लागते. तरीही कसोटीच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया संघ संतुलित वाटतो. वॉर्नर व स्मिथ परतल्यानंतर संघाला आणखी बळकटी येईल. युवा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन व जेसन बेहरेनडॉर्फ यांनी उज्ज्वल भविष्याचे संकेत दिले आहेत. पण खरी परीक्षा अॅरोन फिंच व उस्मन ख्वाजा यांच्या धावसरासरीची आहे. फिंचला आतमध्ये येणाºया चेंडूंपासून सावध रहावे लागेल. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीची धार काहीशी कमी झाल्यासारखी वाटते. मोहम्मद शमीने फारच प्रभावी मारा केला. अॅडिलेडमध्ये भुवनेश्वरश त्याला नवा चेंडू पुन्हा एकदा सांभाळावा लागेल.