मुंबई : भारतामध्ये काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक डे नाइट टेस्ट खेळवण्यात आली होती. ही भारतातील पहिली डे नाइट टेस्ट होती. पण आता डे नाइट टेस्टबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. सध्याच्या घडीला याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर ऐतिहासिक डे नाइट टेस्ट खेळवली गेली होती. ही टेस्ट मॅच भारताने एका डावाने जिंकली होती. त्याचबरोबर मालिकाही जिंकत भारताने चषक उंचावला होता.
या सामन्याला कोलकातावासियांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. कोलकाता हे शहर पूर्णपणे गुलाबी रंगाने न्हाहून निघाले होते. त्याचबरोबर स्टेडियमही सजवण्यात आले होते. या जबरदस्त प्रतिसादामुळे खेळाडूही भारावून गेले होते.
पहिल्या डे नाइट टेस्ट मॅचला मिळालेला प्रतिसाद पाहून आता गांगुली यांनी आपला मानस व्यक्त आहे. जो संघ भारताच्या दौऱ्यावर येईल आणि कसोटी सामना खेळेले. त्या कसोटी मालिकेतील एक सामना डे नाइट खेळवायला हवा, असे गांगुली यांनी म्हटले आहे.