भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं बुधवारी एका चॅनलवर आशिया चषक 2020 रद्द झाल्याचे जाहीर केले. आशिया चषक स्पर्धेबद्दल अशी घोषणा करण्याचे हक्क गांगुलीला कुणी दिलेली नाहीत, असे विधान पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या ( पीसीबी) अधिकाऱ्यानं केलं. पीसीबीचे मीडिया व्यवस्थापक समीऊल हसन बर्नी यांनी सांगितले की, आशिया चषकाबद्दलची घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेनं करावी, बीसीसीआयनं नव्हे.
''सौरव गांगुलीकडून करण्यात आलेल्या विधानाला काहीच अर्थ नाही. तशी विधान त्यांच्याकडून प्रत्येक आठवड्याला केली जातात आणि त्यामुळे त्याला काडीची किंमत किंवा महत्त्व नाही. आशिया चषक स्पर्धेबद्दलचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषद घेईल. त्याची घोषणा फक्त आणि फक्त परिषदेचे प्रमुख नझमुल हसन करतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या पुढच्या बैठकीची तारीखही अजून जाहीर व्हायचीय,''असं पीसीबीकडून सांगण्यात आले.
शाहिद आफ्रिदीची मोठी घोषणा; इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला देणार 'सहारा'!
बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केली शिकार!
वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम