IPL 2023 । अहमदाबाद : आयपीएलच्या 16व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होत आहे. या आगामी हंगामासाठी सर्व संघांनी तयारी पूर्ण केली आहे. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलचा पहिला सामना आणि त्याआधी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. खरं तर पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे, जो भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. मात्र, उद्घाटन सोहळा 6 वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या आधी उद्घाटन समारंभ पार पडेल, ज्यामध्ये भारताची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया नृत्य करणार आहे.
इंडियन प्रीमिअर लीगने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. जगातील सर्वात मोठा क्रिकेट महोत्सव IPL ची सुरुवात जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 31 मार्चला संध्याकाळी 6 वाजल्यापासून हा कार्यक्रम पाहता येईल. तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपट ते बॉलिवूडमध्ये काम केले आहे आणि मनोरंजनाच्या जगात आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान, IPL च्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात तमन्ना शिवाय रश्मिका मंधाना आणि गायक अरिजीत सिंग यांची देखील उपस्थिती असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे कोविड-19 नंतर प्रथमच आयपीएलच्या उद्घाटन समारंभात स्टार्स परफॉर्म करताना दिसणार आहेत. महिला प्रीमिअर लीगचा 2023चा पहिला हंगाम अविस्मरणीय करण्यासाठी बीसीसीआयने उद्घाटन समारंभात स्टार्सना आमंत्रित केले होते, ज्यामध्ये किर्ती सेनन आणि कियारा अडवाणी यांनी मनोरंजन केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"