South Africa T20 squad vs India: इंडियन प्रीमिअर लीगनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध्चया ट्वेंटी-२० मालिकेतून मैदानावर उतरणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात बरेच नवे चेहरे पाहयला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महत्त्वाचा इंग्लंड दौरा लक्षात घेता भारताच्या सीनियर खेळाडूंना बसवण्याची शक्यता आहे. येत्या २२ मे रोजी भारतीय संघ जाहीर केला जाण्याची शक्यता असताना दक्षिण आफ्रिकेनं या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१नंतर टेम्बा बवूमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मैदानावर उतरणार आहे.
९ ते १९ मे २०२२ या कालावधीत भारतात होणाऱ्या मालिकेसाठी आफ्रिकेने संघ जाहीर केला आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या २१ वर्षीय त्रिस्तान स्तुब्ब्स ( Tristan Stubbs) याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. CSK विरुद्ध त्रिस्तान शून्यावर बाद झाला होता. तरीही त्याला संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. २१ वर्षीय फलंदाजानं क्रिकेट दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० चॅलेंज्स स्पर्धेत जीबेट्स वॉरियर्स संघाकडून ४८.८३च्या सरासरीने व १८३.१२च्या स्ट्राईक रेटने २९३ धावा केल्या होत्या. त्यात २३ षटकारांचा समावेश होता. शिवाय झिम्बाब्वेविरुद्धच्या दक्षिण आफ्रिका अ संघाचेही त्याने प्रतिनिधित्व केले आहे. पण, बेबी एबी म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या डेवॉल्ड ब्रेव्हिस याला संधी दिली नाही. ब्रेव्हिसने आयपीएल २०२२मध्ये ६ सामन्यांत १२४ धावा केल्या आहेत.
जलदगती गोलंदाज एनरिच नॉर्खियाचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०२१पासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. रिझा हेड्रीक्स व हेनरिच क्लासेन यांचेही पुनरागमन झाले आहे. २०१७ नंतर वेन पार्नेल कमबॅक करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संध - टेम्बा वबुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेड्रीक्स, हेनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेज शम्सी, त्रिस्तान स्तुब्ब्स, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, मार्को येनसेन ( South Africa T20 squad vs India: Bavuma (C), De Kock, Reeza Hendricks, Heinrich Klaasen, Maharaj, Markram, Miller, Lungi Ngidi, Nortje, Parnell, Dwaine Pretorius, Rabada, Shamsi, Tristan Stubbs, Rassie van der Dusssen, Marco Jansen)