कमकुवत समजणाऱ्यांनीच दिला धोबीपछाड; आफ्रिकेने दिला साहस आणि धैर्याचा परिचय

पहिली कसोटी जिंकल्यावर भारत दुसऱ्या कसोटीत सहज विजय मिळवील, अशी अपेक्षा होती. सर्व पातळीवर भारतीय संघ आघाडीवर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:10 AM2022-01-09T06:10:52+5:302022-01-09T06:11:02+5:30

whatsapp join usJoin us
South Africa beats big poer team India | कमकुवत समजणाऱ्यांनीच दिला धोबीपछाड; आफ्रिकेने दिला साहस आणि धैर्याचा परिचय

कमकुवत समजणाऱ्यांनीच दिला धोबीपछाड; आफ्रिकेने दिला साहस आणि धैर्याचा परिचय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-अयाज मेमन,  कन्सल्टिंग एडिटर 

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत जोहान्सबर्गमध्ये आश्चर्यकारक विजय मिळविला. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. कारण दोन्ही संघ पुढील आठवड्यात केपटाऊन येथे होणाऱ्या निर्णायक कसोटी सामन्यात उतरतील. दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने त्यांच्या धैर्याचा परिचय दिला.

पहिली कसोटी जिंकल्यावर भारत दुसऱ्या कसोटीत सहज विजय मिळवील, अशी अपेक्षा होती. सर्व पातळीवर भारतीय संघ आघाडीवर होता. मात्र, विराट कोहलीला पाठदुखी सुरू झाली आणि त्याचा फटका संघाला बसला. त्याची अनुपस्थिती हा भारतीय संघाला बसलेला एक धक्का होता. मात्र, त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या शक्यतेत फारसा फरक पडेल असे वाटले नव्हते.

ए.बी. हाशिम आमला, फाफ डुप्लेसीस, व्हर्नन फिलंडर यासारखे खेळाडू २०१८ च्या कसोटी मालिकेत खेळले होते. मात्र, ते नसल्याने आफ्रिकेची फलंदाजी कमकुवत होती. ही अस्थिरता डीकॉकच्या निवृत्तीनंतर आणखी धोकादायक बनली. वाँडरर्सला जाण्यापूर्वी भारतीय संघ विजय मिळवील, हे निश्चित होते.
आफ्रिकेच्या अनुभवी खेळाडूंनी भारतीय संघाची कमकुवत बाब समोर आणली. त्यामुळे द्रविड आणि कोहली यांना परिस्थितीला सावरण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतील.

पहिल्या कसोटी दक्षिण आफ्रिकेच्या कमकुवत फलंदाजीमुळे भारत जिंकू शकला. या सामन्यात मयांक आणि राहुल यांनी ११७ धावांची भागीदारी केली होती. मात्र त्यांनी भारताचे वर्चस्व मानण्यास नकार दिला आणि दुसऱ्या कसोटीत निकाल बदलला. पुजारा आणि रहाणे संघाला सामना जिंकून देऊ शकले नाहीत. तर पहिल्या कसोटीत कोहली चमकू शकला नाही. त्यामुळे भारताची मधली फळी डळमळीतच राहिली.
आता कोहली तिसऱ्या सामन्यात संघात परतेल. मग त्याच्यासाठी जागा कोण सोडणार, विहारीने फलंदाजीत धैर्य दाखवले आहे. त्यामुळे द्रविडसाठी हा मोठा मुद्दा असेल.

गोलंदाजी ही भारतीय संघासाठी परदेशात मजबूत राहिली आहे. शमी, बुमराह, ठाकूर, सिराज आणि अश्विन हे प्रभावी ठरले. पण वाँडरर्सवर चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजीत एल्गर आणि फलंदाजांसमोर अपयशी ठरली.  पंत पुन्हा चुकीचा फटका खेळून बाद झाला. यावरही कोहली आणि द्रविडला विचार करावा लागेल.अखेरच्या कसोटीत इतिहास निर्माण करायचा असेल तर भारतीय संघाला काही योग्य बदल करावे लागतील.

दक्षिण आफ्रिकेने प्रतिस्पर्धी संघावर ज्या पद्धतीने मात केली ते वाखाणण्याजोगे होते. दोन्ही संघांच्या इच्छाशक्तीची ही लढाई ठरली. आफ्रिकेने धैर्य आणि संयम दाखविला. डीन एल्गरने घरच्या मैदानावर चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना सात बळी शिल्लक ठेवले आणि सर्वोत्तम विजय मिळविला. कर्णधाराने त्याच्या खेळीतून पीटरसन, व्हॅन डर डुसेन आणि बावुमा या नवख्या फलंदाजांना प्रेरित केले. एल्गर हा आफ्रिकेच्या धैर्याचे प्रतीक ठरला. पुजारा आणि रहाणेच्या भागीदारीने जो फायदा भारताला मिळाला होता तो रबाडाने मिळू दिला नाही.

Web Title: South Africa beats big poer team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.