Join us  

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजय; श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या

यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 10:35 PM

Open in App

दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला हरवत विश्व चषकातील दुसरा विजय नोंदविला. श्रीलंकेने सुरूवातीला नाणेफेक जिंकून आफ्रिकेसमोर 204 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आफ्रिकेने सहजरित्या पेलले. 37.2 ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावत श्रीलंकेवर विजय मिळविला. 

यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यासाठी त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची पंचायत झाली आहे. फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे श्रीलंकेला 203 धावाच करता आल्या. ख्रिस मॉरिस आणि ड्वेन प्रेटोरीस यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.क्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेला साजेशी सुरूवात करता आली नाही. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कागिसो रबाडाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्याने सलामीवीर व कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( 0) याला फॅफ ड्यू प्लेसिसकरवी झेलबाद केले.

करुणारत्ने शून्यावर बाद होऊनही एक पराक्रम करून गेला. रबाडाने टाकलेल्या चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलेल्या करुणारत्नेने पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. शिवाय गोल्डन डक नावावर करणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी आशियातील एकाही कर्णधारावर अशी नामुष्की ओढावलेली नाही. 

यानंतर आफ्रिकेने सावध सुरुवात करताना 31 धावांवर पहिला बळी गमावला. डीकॉक वैयक्तिक 15 धावांवर त्रिफळाचित झाला. यानंतर हाशिम अमला याने नाबाद 80 आणि फाफ डू प्लेसिसने नाबाद 96 धावा काढत श्रीलंकेवर 9 गड्यांनी विजय नोंदविला. लसिथ मलिंगाने एकमेव बळी टिपला.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019श्रीलंकाद. आफ्रिका