T20 World Cup, SA beat PAK : दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानला आरसा दाखवला; शतकवीर Rassie van der Dussen पुरून उरला

T20 World Cup, SA beat PAK : भारतीय संघाला यंदा पराभूत करणारच, असा दावा करणाऱ्या पाकिस्तान संघाला बुधवारी दक्षिण आफ्रिकेनं सराव सामन्यात आरसा दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:32 PM2021-10-20T23:32:54+5:302021-10-20T23:34:02+5:30

whatsapp join usJoin us
South Africa chase down 187 runs in the final ball of the innings with Van Der Dussen scored unbeaten 101against Pakistan | T20 World Cup, SA beat PAK : दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानला आरसा दाखवला; शतकवीर Rassie van der Dussen पुरून उरला

T20 World Cup, SA beat PAK : दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानला आरसा दाखवला; शतकवीर Rassie van der Dussen पुरून उरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, SA beat PAK : भारतीय संघाला यंदा पराभूत करणारच, असा दावा करणाऱ्या पाकिस्तान संघाला बुधवारी दक्षिण आफ्रिकेनं सराव सामन्यात आरसा दाखवला. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या सराव सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( १५)  व मोहम्मद रिझवान ( १९) हे दोघेही अपयशी ठरले. हट्टानं संघात घेतलेल्या शोएब मलिकलाही फार काही करता आले नाही. कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डेर ड्युसेननं ( Rassie van der Dussen ) नाबाद शतकी करून एकट्यानं पाकिस्तानला पाणी पाजलं.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर ३६ धावांवर माघारी परतले. फाखर जमाननं एकट्यानं खिंड लढवली. त्यानं २८ चेंडूंत २ चौकार व ५ षटकार खेचून ५२ धावा केल्या. मोहम्मद हाफिज ( १३) व शोएब मलिक ( २८) हे सीनियर खेळाडूही अपयशी ठरले. आसिफ अलीनं १८ चेंडूंत ३२ धावा करताना संघाला ६ बाद १८६ धावांपर्यंत मजल मारून दिली. कागिसो रबाडानं पाक कर्णधार आजमचा त्रिफळा उडवण्यासह तीन विकेट्स घेतल्या. 


प्रत्युत्तरात आफ्रिकेच्याही क्विंटन डी कॉक ( ६) व रिझा हेंड्रीक्स ( ७) या सलामीवीरांनी इमाद वासीमसमोर शरणागती पत्करली. पण, व्हॅन डेर ड्युसेन व कर्णधार टेम्बा बवुमा खेळपट्टीवर चिकटले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. बवुमा ४२ चेंडूंत ४६  ( २ चौकार व २ षटकार) धावा करून माघारी परतला. त्यानंतर व्हॅन डेर ड्यूसेननं एकट्यानं खिंड लढवली. त्यानं ५१ चेंडूंत १० चौकार व ४ षटकांसह नाबाद १०१ धावा करताना आफ्रिकेला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. आफ्रिकेनं ४ बाद १९० धावा करून सहा विकेट्सनं हा सामना जिंकला. पाकिस्ताननं अखेरच्या ७ षटकांत ९२ धावा दिल्या.  

Web Title: South Africa chase down 187 runs in the final ball of the innings with Van Der Dussen scored unbeaten 101against Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.