South Africa Team: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पाचव्या सामन्यात केशव महाराज दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता. याच केशव महाराजची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, केशव महाराज भगवान हनुमानाचा मोठा भक्त असून, त्याचे उत्तर प्रदेशशी जवळचे संबंध आहेत.
उत्तर प्रदेशशी जवळचे संबंध भारतीय वंशाच्या केशव महाराज याचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे, त्यामुळेच तो त्या देशातून क्रिकेट खेळतो. विशेष म्हणजे, आफ्रिकेत राहूनही तो हिंदू रीतिरिवाजांचे पालन करतो. तो हनुमानाचा मोठा भक्त आहे. केशव महाराजचे पूर्वज 1874 मध्ये भारतातून डर्बनमध्ये नोकरीच्या शोधात आले होते आणि त्यानंतर तिथेच स्थायिक झाले. केशव महाराजांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील रहिवासी होते.
दक्षिण आफ्रिकेत जन्मया वर्षी जानेवारीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या मालिकेनंतर केशवने सोशल मीडियावर 'जय श्री राम' लिहिले होते. हिंदू संस्कृतीचे पालन केल्यामुळे केशव महाराज सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. केशव महाराज याचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला. केशव महाराज याचे वडीलही दक्षिण आफ्रिकेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत.
दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो
केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहेत. त्याने आफ्रिकन संघासाठी 42 कसोटी सामन्यात 150 विकेट्स, 21 एकदिवसीय सामन्यात 26 बळी आणि 9 टी-20 सामन्यात 7 बळी घेतले आहेत. तो त्याच्या धोकादायक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.
Web Title: South Africa cricketer Keshav Maharaj is a big devotee of Lord Hanuman, he Has a close relation with UP
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.