मुंबई : क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आणि वाढत जाणाऱ्या लीग पाहता दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली आहे. जानेवारीमध्ये तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ जानेवारी महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवा गोलंदाज व्हर्नान फिलँडर आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
फिलँडरने २००७ साली ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला फक्त सात ट्वेन्टी-२० सामने खेळता आले. फिलँडरने ५८ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या ५८ कसोटी सामन्यांमध्ये फिलँडरच्या नावावर २१४ बळी आहेत. फिलँडरने ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ बळी मिळवले आहेत.