IND vs SA 1st T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या १५ चेंडूंत ९ धावा अन् ५ विकेट्स; अर्शदीप सिंगने एकाच षटकात तीन धक्के, video

India vs South Africa 1st T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी कमाल करताना दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ ९ धावांवर माघारी पाठवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 07:22 PM2022-09-28T19:22:22+5:302022-09-28T19:23:17+5:30

whatsapp join usJoin us
South Africa now 9/5 in 15 balls - this is fantastic from Arshdeep Singh and Deepak Chahar. Carnage from both!, Video | IND vs SA 1st T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या १५ चेंडूंत ९ धावा अन् ५ विकेट्स; अर्शदीप सिंगने एकाच षटकात तीन धक्के, video

IND vs SA 1st T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या १५ चेंडूंत ९ धावा अन् ५ विकेट्स; अर्शदीप सिंगने एकाच षटकात तीन धक्के, video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी कमाल करताना दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ ९ धावांवर माघारी पाठवला. अर्शदीप सिगंने दुसऱ्याच षटकात तीन विकेट्स घेतल्या, तर दीपक चहरने दोन धक्के दिले. 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २० ट्वेंटी-२० सामने झाले आणि त्यात जय-पराजयाचे पारडे हे भारताच्या बाजूने ११-८ असे आहे. पण, भारताला घरच्या मैदानावर ५ वेळा आफ्रिकेकडून हार मानावी लागली आहे. ९ पैकी ३ सामने भारताला जिंकता आले आहेत. मागे झालेल्या ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने बाजी मारली होती. त्या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली गेली होती. हार्दिकच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली आहे, जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे आज मुकावे लागले आणि त्याच्या जागी दीपक चहर खेळणार आहे, युजवेंद्र चहलच्या जागी आर अश्विन खेळेल. BCCI ने दिलेल्या माहितीनुसार सराव सत्रात जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढले. वैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. तो पहिल्या ट्वेंटी-२०त खेळणार नाही.  

दीपक चहरने पहिल्याच षटकात अप्रतिम इनस्वींग चेंडू टाकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाचा त्रिफळा उडवला. अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात आफ्रिकेचा दुसरा सलामीवीर क्विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवला. आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर 1 धावेवर माघारी परतले. अर्शदीपने टाकलेला चेंडू क्विंटनच्या बॅटची इनसाईड एज घेत यष्टींवर आदळला. अर्शदीपने त्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या चेंडूवर आफ्रिकेला दोन धक्के दिले. रिली रोसोवू व डेव्हिड मिलर शून्यावर बाद झाले आणि आफ्रिकेची अवस्था ४ बाद ८ धावा अशी झाली.  त्यानंतर दीपकने आणखी एक विकेट घेतली, अर्शदीपने अफलातून झेल घेतला. 

 

Web Title: South Africa now 9/5 in 15 balls - this is fantastic from Arshdeep Singh and Deepak Chahar. Carnage from both!, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.