- ग्रॅमी स्मिथ
विश्वकप स्पर्धेत आता यानंतरची लढत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान होणार आहे. उभय संघांपैकी केवळ पाकिस्तानकडे विश्वकप जिंकण्याची संधी धूसर आहे. दरम्यान त्यांना चुकीच्या संघनिवडीचा फटका बसला. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर संघाचा आत्मविश्वास उंचावलेला होता, पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्ध टाँटनमध्येही पाक संघाने संधी गमावली. त्या लढतीत त्यांना केवळ एका अशा खेळाडूची गरज होती जो खेळपट्टीवर तळ ठोकू शकेल. जर असे घडले असते तर गुणतालिकेत हा संघ चांगल्या स्थितीत असता.
या विश्वकप स्पर्धेत जास्तीत जास्त लढतींमध्ये प्रथम फलंदाजी करणारे संघ विजयी ठरत आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला आश्चर्य वाटले. विशेषता २०१७ च्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीनंतर पाक संघाचा हा निर्णय चुकीचा ठरला. जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर तुमच्याकडे करण्यासाठी काही शिल्लक नसते.
दक्षिण आफ्रिका संघाची चर्चा केली तर त्यांच्यासाठी या स्पर्धेत विशेष असे सकारात्मक घडले नाही. क्रिस मॉरिसने मात्र मला प्रभावित केले. मी त्याच्यावर टीकाही करतो कारण तो आपल्या प्रतिभेला न्याय देत नाही.
उभय संघांसाठी कदाचित ही विश्वकप स्पर्धा संपलेली आहे. कदाचित हाशिम अमलाची ही अखेरची विश्वकप स्पर्धा असेल. त्याच्यासारख्या उंची लाभलेल्या खेळाडूसाठी अशी स्थिती निराशाजनक आहे. तो आपली जादू विसरल्याचे भासत आहे. त्याच्यासारख्या खेळाडूने आपल्या अटीवर खेळातून निवृत्ती स्वीकारावी, असे वाटते पण माझ्या मते त्याच्या हातातून ही बाब आता निसटली आहे.
Web Title: South Africa now give youngsters a chance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.