Join us  

South Africa ODI squad vs India : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; त्यांनीही कर्णधार बदलला, नव्या गोलंदाजाला दिलीय संधी

IND vs SA, ODI Team & Schedule : कसोटी मालिकेत पिछाडीवर पडलेल्या दक्षिण आफ्रिका संघानं रविवारी आगामी वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 7:27 PM

Open in App

IND vs SA, ODI Team & Schedule : कसोटी मालिकेत पिछाडीवर पडलेल्या दक्षिण आफ्रिका संघानं रविवारी आगामी वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. १९ जानेवारीपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतानं दोन दिवसांपूर्वी वन डे संघ जाहीर केल्यानंतर आज आफ्रिकेनंही संघाची घोषणा केली. टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) हा पुन्हा कर्णधारपदी विराजमान झाला असून मार्को जॅन्सेन या जलदगीत गोलंदाजाला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. शिवाय वेन पार्नेल, रियान रिक्लेल्टन, सिसांडा मगाला आणि झुबयर हम्झा यांनी संघातील स्थान कायम राखले आहे.  

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळून झाल्यानंतर वन डे मालिका खेळणार आहे. १९ जानेवारीपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना १९ तारखेला तर दुसरा सामना २१ तारखेला बोलंड पार्क, पार्ल येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना २३ जानेवारीला केपटाऊनला खेळण्यात येणार आहे.

भारताचा संघ- केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक, झुबयर हम्झा, मार्को जॅन्सेन, सिसांडा मगाला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पार्नेल, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयने. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाद. आफ्रिका
Open in App