Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out

Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar Rashid Khan, Afghanistan vs South Africa 1st ODI: ७ बाद ३६ या धावसंख्येवर होता आफ्रिकेचा संघ, विआन मुल्डरच्या अर्धशतकाने रडतखडत गाठून दिलं शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 08:43 PM2024-09-18T20:43:39+5:302024-09-18T20:44:43+5:30

whatsapp join usJoin us
South Africa shocking batting collapse in 1st ODI against Afghanistan 106 runs all out | Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out

Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar Rashid Khan, Afghanistan vs South Africa 1st ODI: क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे हे वेळोवेळी सिद्ध होते. तसाच काहीसा प्रकार आज अफगाणिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला. अफगाणिस्तानच्या वेगवान आणि स्पिन अशा दुहेरी आक्रमणापुढे दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची अक्षरश: तारांबळ उडाली. वेगवान गोलंदाज फजलहक फारूखीचे ४ बळी आणि १७ वर्षीय स्पिनर आल्ला घझनफारचे ३ बळी तर राशिद खानचे २ बळी यांच्या जोरावर अफगाणिस्तानने आफ्रिकेला अवघ्या १०६ धावांवर ऑलआऊट केले. दक्षिण आफ्रिकेकडून विआन मुल्डरने अर्धशतक ठोकले. इतर सर्व फलंदाज निकामी ठरले.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकत फलंदाजीची निवड केली. पण डावात एकेकाळी आफ्रिकेची अवस्था ७ बाद ३६ इतकी वाईट झाली होती. सलामीवीर रिझा हेंड्रिक्स (९), टोनी डी जॉर्जी (११), एडन मार्करम (२), ट्रिस्टन स्टब्स (०), कायल वेरियने (१०), जेसन स्मिथ (०) आणि अँडिल फेलुक्वायो (०) हे पहिले सात फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.

विआन मुल्डरने आफ्रिकेच्या डावाला एका बाजूने आधार दिला. एकीकडे धडाधडा विकेट्स पडत असताना मुल्डरने संयमी अर्धशतक ठोकले. त्याने ५ चौकार आणि १ षटकार खेचत ८४ चेंडूत ५२ धावांची चिवट खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच आफ्रिकेने रडतखडत शतकी धावसंख्या गाठली. खालच्या फळीत बजोर्न फॉर्टीनने १६ धावा केल्या. इतरांनी निराशाच केली. अखेर ५ अतिरिक्त धावांच्या साथीने आफ्रिकेचा डाव १०६ धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज फजलहक फारूखीने ४, १७ वर्षीय स्पिनर आल्ला घझनफारने ३ तर अनुभवी फिरकीपटू राशिद खानने २ बळी घेतले.

Web Title: South Africa shocking batting collapse in 1st ODI against Afghanistan 106 runs all out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.