South Africa T20 World Cup squad: दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वात आफ्रिकेचा संघ क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळणार आहे. विशेष बाब म्हणजे आफ्रिकेच्या विश्वचषकाच्या संघात माजी कर्णधार टेम्बा बवुमाला जागा मिळाली नाही. तसेच रेयान रिकेल्टन आणि वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमॅन या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. ते दोघेही आगामी विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतील.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. तो सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा भाग आहे. हैदराबादच्या फलंदाजांचा या हंगामात बोलबाला असला तरी मार्करमला म्हणावी तशी खेळी करता आली नाही. तो सतत खराब फॉर्मचा सामना करत आहे.
विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -
एडन मार्करम (कर्णधार), रेयान रिकेल्टन, क्विंटन डीकॉक, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ब्योर्न फोर्टुइन, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, केशव महाराज, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, ओटनील बार्टमॅन, गेराल्ड कोएत्जी, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स,
राखीव खेळाडू - नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ -
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट -
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
Web Title: South Africa T20 World Cup squad Aidan Markram named captain while Temba Bavuma dropped
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.