संजू सॅमसनचं विक्रमी सेंच्युरी आणि तिलक वर्मानं १८ चेंडूत केलेल्या ३३ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद २०२ धावा करत यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २०३ धावांचे टार्गेट ठेवले. डरबनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. भारतीय ताफ्यातील प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंग याने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम याला तंबूचा रस्ता दाखवला.
मार्करमची आक्रमक सुरुवात, एकापाठोपाठ एक खणखणीत चौकार
खरं तर भारतीय संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेल्या अर्शदीप सिंगची सुरुवातच तशी खराब झाली होती. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर एडन मार्करमनं खणखणीत चौकार मारत संघासह आपलं खातं उघडलं. दुसऱ्या चेंडूवरही पुन्हा चौकार मारत दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानं आपले इरादे स्पष्ट केले. पण त्याचा हा रुबाब अर्शदीप सिंगसमोर फार काळ टिकला नाही.
त्यानंतर अर्शदीपनं दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनला जाळ्यात अडकवलं
लेंथमध्ये कोणताही बदल न करता मोठया धाडसानं त्यानं अर्शदीपनं त्याच लेंथवर गोलंदाजी करण्याला पसंती दिली. अन् तिसऱ्या चेंडूवर मार्करमला त्याने विकेटमागे संजू करवी झेलबाद केले. पहिल्याच षटकात त्याने संघाला मोठं यश मिळवून दिले. सलग दौन चौकार मारल्यावर कमबॅक कसं करायचं ते चांगलं कळतं हेच त्याने दाखवून दिले.
सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांच्या यादीत आहे अर्शदीप
अर्शदीप सिंग हा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा यशस्वी गोलंदाज आहे. ते त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. मार्करमच्या विकेटसह टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ८८ विकेट्सह चौथ्या क्रमांकावर पोहचला. या यादीत युझवेंद्र चहल ९६ विकेटसह सर्वात आघाडीवर आहे. भुवनेश्वर कुमारनं बारतीय संघाकडून टी-२० मध्ये ९० विकेट्स घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ या यादीत जसप्रीत बुमराहचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ८९ विकेट्स आहेत. अर्शदीपला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नंबर वनवर विराजमान होण्याची संधी आहे.
Web Title: South Africa vs India, 1st T20I Aiden Markram smashed 2 boundaries Arshdeep Singh made a comeback and dismissed SA Captain Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.