IND vs SA 2nd T20I After two consecutive centuries Sanju Samson bags a duck दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. भारतीय डावाच्या पहिल्याच षटकातील मार्को जन्सेन याने त्याला क्लीन बोल्ड केले. संजूची विकेट मिळवल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील या गोलंदाजांचा आनंद गगनात मावेना, असा सीन पाहायला मिळाला. त्याने खास अंदाजात सेलिब्रेशन करत त्याने संजूच्या बिग विकेट्सचा आनंद व्यक्त केला. षटक निर्धाव टाकत मार्कोनं आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली.
सलग दोन शतकानंतर लाजिरवाणी कामगिरी
डरबनच्या मैदानात संजू सॅमसन यानं सलग दुसऱ्या शतकासह खास विक्रम आपल्या नावे केला होता. त्याआधी हैदराबादच्या मैदानात बांगलादेश विरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शतकी खेळीसह आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरला. पण त्यानंतर आता पदरी भोपळा पडताच त्याच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
आता वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिला
यंदाच्या वर्षात आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्यांदा शून्यावर बाद होण्याची नामुष्की संजू सॅमसनवर ओढावली आहे. एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक शून्यावर आउट होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो टॉपला आहे. त्याच्यापाठोपाठ युसूफ पठाणचा नंबर लागतो. २००९ मध्ये तो चार वेळा शून्यावर बाद झाला होता. २०१८ मध्ये रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ३ वेळा शून्यावर आउट झाला होता. याच वर्षी विराट कोहलीवर तीन वेळा अशी वेळ आली होती. टी-२० क्रिकेटमध्ये कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत संजू सॅमसन एकमेव सक्रीय खेळाडू आहे. बाकी सर्वांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
संजू सॅमसनला प्रमोशन अन्...
संजू सॅमसन हा टीम इंडियात कमी संधी मिळालेल्या खेळाडूंपैकी एक आहे. बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेपासून त्याच्यावर संघाच्या डावाची सुरुवात करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. या संधीचं सोनं करून दाखवल्यानंतर आता त्याच्या पदरी भोपळा पडलाय. ही खेळी विसरुन उर्वरित दोन सामन्यात पुन्हा दमदार कमबॅक करून टीम इंडियातील स्थान कायम राखण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.