South Africa vs India 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना गकेबहराच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. याचा अर्थ दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही एकाही नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (विकेट किपर बॅटर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
एडन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेट किपर बॅटर), डेव्हिड मिलर, मार्को जानेसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नकाबा पीटर