South Africa vs India, 2nd T20I Varun Chakravarthy picked 5 wicket haul : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीनं आपल्या गोलंदाजीतील जलवा दाखवून दिला. डरबनच्या मैदानता मॅचला टर्निंग पाइंट देण्याची कामगिरी केल्यानंतर सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याने कमालीची गोलंदाजी करत टीम इंडियालाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मिस्ट्री स्पिनरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात १७ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
या फलंदाजांची केली शिकार
वरुण चक्रवर्तीनं सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (२४), कर्णधार एडेन मार्करम (३), मार्को जेन्सन (७) आणि डेविड मिलर (०) आणि हेन्रिक क्लासेन (२) या खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरी नोंदवताना त्याने खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात 'पंजा' मारणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे.
असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला वरुण
वरुण चक्रवर्तीच्या आधी भुवनेश्वर कुमार याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात ५ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय कुलदीप यादव याने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात १७ धावा खर्च करून ५ विकेट्स अशी कामगिरी करून दाखवली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती कुलदीपसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पाकचा उमर गुल टॉपला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ३ धावा खर्च करून ५ विकेट्स मिळवल्याचा रेकॉर्ड आहे.