IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या अभिषेक शर्मानं तोऱ्यात केली बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 09:50 PM2024-11-13T21:50:44+5:302024-11-13T21:53:13+5:30

whatsapp join usJoin us
South Africa vs India, 3rd T20I Abhishek Sharma smashed a fifty in just 24 balls against South Africa in Third T20I Match | IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

South Africa vs India, 3rd T20I Abhishek Sharma Smashed A Fifty : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माची बॅट अखेर तळपली आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत शतकी खेळीनंतर सातत्याने पदरी अपयश आल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढा, असा सूर उमटत होता. पण अखेर त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. तिसऱ्या टी-२० सामन्यात पुन्हा टॉस गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलमीवीर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. या परिस्थितीत खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या अभिषेक शर्मानं तोऱ्यात बॅटिंग करत तिलक वर्माच्या साथीनं संघाचा डाव सावरला. 

३ खणखणीत चौकारासह ५ षटकारांनी बहरली त्याची  खेळी

सिक्सर किंग युवराज सिंगच्या पठ्ठ्यानं २४ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. या खेळीत त्याने ३ खणखणीत चौकारासह ५ उत्तुंग षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. अर्धशतकानंतरही मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात तो बाद झाला. केशव महाराजच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् विकेट मागे हेनरिक क्लासेननं चपळता दाखवत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अर्धशतकी खेळी आणखी मोठी करण्याचा त्याची संधी हुकली असली तरी संघाचा डाव सावरण्यासाठी त्याची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने २५ चेंडूत २०० च्या स्ट्राइक रेटनं ५० धावा केल्या. 

सातत्य कायम ठेवण्याचं चॅलेंज

अभिषक शर्मानं ११ आंतरारष्ट्रीय सामन्यात एका शतकासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या झळकावलेल्या अर्धशतकी खेळीसह २२० धावा केल्या आहेत.  त्याचे स्ट्राइक रेट १६७.९४ च्या घरात आहे. १०० ही त्याची टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील खेळीसह त्याने संघ व्यवस्थापनानं आपल्यावर दाखवलेला भरवसा सार्थ ठरवला आहे. पुढच्या सामन्यात सातत्य कायम राखण्याचे चॅलेंज त्याच्यासमोर असेल.

 

Web Title: South Africa vs India, 3rd T20I Abhishek Sharma smashed a fifty in just 24 balls against South Africa in Third T20I Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.