सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

संजू सॅमसनवर ओढावली एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर आउट होण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 08:48 PM2024-11-13T20:48:44+5:302024-11-13T21:09:52+5:30

whatsapp join usJoin us
South Africa vs India, 3rd T20I Sanju Samson 1st ever Player to Score 5 T20I Ducks in a Year | सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sanju Samson 1st ever Player to Score 5 T20I Ducks in a Year : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन पुन्हा अपयशी ठरला आहे. डरबनच्या मैदानात बॅक टू बॅक सेंच्युरीसह विक्रमी कामगिरी करून दाखवणाऱ्या संजूवर सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर आउट होण्याची वेळ आली. दुसऱ्या टी-२० सामन्यात ज्या गोलंदाजानं त्याची विकेट घेतली त्याच मार्को यान्सेन यानं पुन्हा संजूला बोल्ड आउट केले. यासह संजूच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा  शून्यावर आउट होणारा तो फलंदाज ठरला आहे. २०२४ मध्ये पाचव्यांदा त्याच्यावर ही वेळ आलीये.

कॅलेंडर ईयरमध्ये पाचव्यांदा संजूवर आली ही वेळ

आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत संजू सॅमसन सहाव्यांदा शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातील पाच वेळी २०२४ या वर्षात त्याच्या पदरी भोपळा पडला. भारताकडून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत रोहित शर्मा सर्वात टॉपला आहे. १२ वेळा तो शून्यावर आउट झाला आहे. त्यापाठोपाठ या यादीत विराट कोहलीचा नंबर लागतो. तो सात वेळा शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

याआधी कोणत्याही फलंदाजावर आली नाही ही वेळ

संजू सॅमसन याने बांगलादेश विरुद्ध हैदराबादच्या मैदानात ४७ चेंडूत १११ धावांची खेळी केली होती. डरबनच्या मैदानात ५० चेंडूत १०७ धावांची खेळी करत त्याने बॅक टू बॅक सेंच्युरीसह खास विक्रम आपल्या नावे नोंदवला. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट रोहितला जे जमलं नाही ते त्याने करून दाखवलं. पण त्यानंतर आता सलग दोन सामन्यात त्याच्या पदरी भोपळा आला आहे.  गकेबरहाच्या मैदानात ३ चेंडूचा सामना करून तो खातेही न उघडता माघारी फिरला होता.  सेंच्युरियनच्या मैदानात तो फक्त २ चेंडूचा सामना करून शून्यावर बाद झाला. दोन सलगशतकी खेळी नंतर सलगभोपळा पदरी पडलेला तो पहिला क्रिकेटही ठरलाय.

 

Web Title: South Africa vs India, 3rd T20I Sanju Samson 1st ever Player to Score 5 T20I Ducks in a Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.