South Africa vs India, 3rd T20I Tilak Varma Hits Maiden Century : सेंच्युरियनच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्मानं टी-२० कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक झळकावलं. ५१ चेंडूत त्याने आपलं शतक साजरं केले. भारतीय संघानं पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर सूर्यकुमार यादवनं तिलक वर्माला बढती देत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. या संधीच तिलक वर्मानं सोनं करून दाखवलं.
तिलक वर्मानं पाकिस्तानी क्रिकेटरच्या रेकॉर्डला लावला सुरुंग
त्याची ही शतकी खेळी ८ चौकार आणि ७ षटकारांनी बहरलेली होती. तिलक वर्मानं ५६ चेंडूत नाबाद १०७ धावांची नाबाद खेळी केली. या शतकी खेळीसह तिलक वर्मानं खास विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानच्या फलंदाजाचा रेकॉर्ड मोडित काढत तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय टी सामन्यात शतकी खेळी करणारा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वी जैस्वालनंतर त्याच्या भात्यातून कमी वयात शतक आल्याचे पाहायला मिळाले.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारे खेळाडू
तिलक वर्मानं २२ वर्षे आणि ५ दिवस वयात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शतक साजरे केले. या यादीत पाकिस्तानचा अहमद शहजाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २२ वर्षे १२७ दिवस वयात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली होती. शुबमन गिलनं २३ वर्षे १४६ दिवस वयात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतकी खेळी केली होती. याशिवाय सुरेश रैनाचाही या यादीत समावेश आहे. रैनानं २३ वर्षे १५६ दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय टी-२० शतक झळकावले होते.
युवा शतकवीर! कुणी कधी अन् कुणाविरुद्ध झळकावलं शतक?
- यशस्वी जैस्वाल (भारत) विरुद्ध नेपाळ वय- २१ वर्षे २७९ दिवस (२०२३)
- तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका वय- २२ वर्षे ५ दिवस (२०२४)
- अहमद शहजाद (पाकिस्तान) विरुद्ध बांगलादेश वय- २२ वर्षे १२७ दिवस (२०१४)
- शुबमन गिल (भारत) विरुद्ध न्यूझीलंड वय- २३ वर्षे १४६ दिवस (२०२३)
- सुरेश रैना (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका वय-२३ वर्षे १५६ दिवस (२०१०
Web Title: South Africa vs India, 3rd T20I Tilak Varma Hits Maiden Century At Centurion Super Sport Park
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.