South Africa vs India, 4th T20I India opt to bat : भारतीय संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवन याने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात अखेर टॉस जिंकला. पहिल्या तीन सामन्यात त्याने टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले होते. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूनं लागल्यावर त्याने पहिल्यांदा फंलदाजी करण्याला पसंती दिलीये. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर टार्गेट सेट करताना दिसेल. याआधीच्या तिन्ही सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली होती.
चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे. टार्गेट सेट करून मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
भारतीय प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (विकेट किपर बॅटर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेट किपर बॅटर), डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएत्झी, अँडीले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला.