Sanju Samson's Six Ball Hit One Of The Female Fan दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या टी-२० सामन्यातील शतकानंतर दोन वेळा भोपळा पदरी पडलेल्या संजू सॅमसन याने चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. भारतीय डावातील पहिला षटकार मारणाऱ्या संजूनं चौकार- षटकारांच्या फटकेबाजीसह क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचं पारण फेडलं. पण स्टेडियमवर मॅचचा आनंद घेणाऱ्या एका लेडी फॅनसोबत मात्र एक दुर्घटना घडली. संजून मारलेला एक सिक्सरवाला एका चेंडू तिला लागला अन् तिच्यावर रुमाल गालावर धरून रडण्याची वेळ आली.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना मार्करमनं चेंडू पार्ट टाइम बॉलर ट्रिस्टन स्टब्सच्या हाती सोपवला. भारतीय डावातील दहाव्या षटकातील त्याच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन याने षटकार मारून त्याचे स्वागत केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही संजून कडक षटकार मारला. हा चेंडू स्टेडियममध्ये मॅचचा आनंद घेणऱ्या लेडी फॅनला लागला. तिचा फोटो व्हायरल होताना दिसतोय. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या चौकार षटकारांच्या आतषबाजीत या महिला चाहतीवर गालावर रुमाल धरून रडण्याची वेळ आली.