लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावंसख्या उभारली आहे. सलामीवीर रचिन रविंद्र १०८ (१०१) आणि केन विलियम्सन १०२ (९४) यांनी केलेल्या शतकी खेळीनंतर डॅरेल मिचेल ४९(३७) आणि ग्लेन फिलिप्स ४९ (२७) फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित ५० षटकात ६ बाद३६२ धावा केल्या. सामान जिंकून फायनल गाठण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करून नवा विक्रम प्रस्थापित करावा लागेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड
याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियन संघाच्या नावे होता. यंदाच्या हंगामात इंग्लंड विरुद्ध त्याने ३५१ धावांचा पाठलाग करताना ५ बाद ३५६ धावा केल्या होत्या. इंग्लंडनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३५१ धावांचा रेकॉर्ड मॅचनंतर लगेच उद्धस्त झाला होता. २००४ च्या हंगामात न्यूझीलंडच्या संघानं युएई विरुद्ध ४ बाद ३४७ अशी धावसंख्या उभारली होती. याशििवाय २०१७ च्या हंगामात पाकिस्तानच्या संघानं फायनलमध्ये भारतीय संघासमोर ४ बाद ३३८ धावा करून जेतेपद पटकावले होते.
रचिन-केन जोडी जमली अन् दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पडले
पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला लुंगी एनिग्डीनं पहिला धक्का दिला. विल यंगला त्याने २१ धावांवर माघारी धाडले. पण त्यानंतर केन आणि रचिन जोडी जमली. तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. रचिन रविंद्रनं आपल्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. तो १०१ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०८ धावा करुन बाद झाला. ही विकेट गमावल्यावर केन विलियम्सन याने वनडे कारकिर्दीतील १५ व्या शतकाला गवसणी घातली. शतकी खेळीनंतर आक्रम अंदाजात खेळताना तो बाद झाला. त्याने ९४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय डॅरिल मिचेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी ४९-४९ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विक्रमी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनिग्डीला सर्वाधिक ३ , राबाडाला २ तर मुल्डरला एक विकेट मिळाली.
Web Title: South Africa vs New Zealand Champions Trophy 2025 semifinal Hundreds from Rachin Ravindra And Kane Williamson set up NZ’s record total Against SA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.