South Africa vs Pakistan, Masood And Babar Azam Set New World Record In Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाची नव्या वर्षाची सुरुवातही खराब झालीये. केपटाउन कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्या डावात ६०० पेक्षा अधिक धावा करून पाकिस्तानला २०० धावांच्या आत गुंडाळले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. पण दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या सलामी जोडीनं कमाल केली. संघ पराभवाच्या छायेत असताना शान मसूद आणि बाबर आझम या जोडीनं दुसऱ्या डावात द्विशतकी भागीदारीसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबर आझमनं शान मसूदच्या साथीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
पाकिस्तानच्या संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फॉलोऑन मिळाल्यावर फक्त एकदाच शतकी भागीदारी पाहायला मिळाली होती. १९५८ मध्ये हनीफ अहमद आणि इम्तियाज अहमद जोडीनं ही कामगिरी केली होती. वेस्टइंडिज विरुद्धच्या ब्रिजटाउनच्या मैदानात या जोडीनं १५२ धावांची भागीदारी रचली होती. केपटाउनच्या मैदानात शान मसूद आणि बाबर आझम या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांचा विक्रम तर मोडला. एवढेच नाही तर द्विशतकी भागीदारीसह वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. दोघांनी दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी २०५ धावा केल्या. यात बाबर आझमनं ८१ (१२४) तर शान मसूदनं १०२ (१६६)* धावांचे योगदान दिले.
पाक जोडीनं मोडला दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीचा विश्व विक्रम
कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात फॉलोऑन मिळाल्यावर सर्वाच्च ओपनिंग भागीदारीचा रेकॉर्ड आता शान मसूद आणि बाबर आझम या जोडीच्या नावे झाला आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि नील मॅककेन्झी यांचा विश्व विक्रम मोडीत काढला. दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीनं २००८ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानात फॉलोऑन मिळाल्यावर २०४ धावांची भागीदारी रचली होती.
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात फॉलोऑन मिळावल्यावर सलामीवीरांच्या सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड्स
- २०५ धावा - शान मसूद आणि बाबर आझम (पाकिस्तान) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाउन (२०२५)
- २०४ धावा - ग्रॅमी स्मिथ आणि नील मॅककेन्झी (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स (२००८)
- १८५ धावा - तमिम इक्बाल आणि इमरुल केस (बांगलादेश) विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स,२०१०
- १८२ धावा - मार्कस ट्रेस्कोथिक आणि मायकेल वॉन (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंटजॉन्स, २००४
- १७६ धावा- ग्रॅहम गूच आणि मायकेल आथरटन (इंग्लंड) विरुद्ध भारत, द ओव्हल, १९९०
Web Title: South Africa vs Pakistan 2nd Test Shan Masood And Babar Azam Set New World Record Of Highest opening stands while following on in Tests
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.