क्षेत्ररक्षणात पाकिस्तानी खेळाडूंकडून हास्यास्पद चूका होणे, काही नवीन गोष्ट नाही. त्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सहज सापडतील. त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातील पाकिस्तानी खेळाडू शरजील खान याची फिल्डिंग पाहून सध्या सर्व लोटपोट झाले आहेत. चार वर्षानंतर शरजील पाकिस्तानी संघात पतरला आणि त्यानं स्वतःचं हसू करून घेतलं.
तंदुरूस्तीच्या कारणावरून शरजीलवर टीका होत होती, त्यात आता क्षेत्ररक्षणातील या चुकीमुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात १३व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडेनं उत्तुंग फटका मारला. उस्मान कादीरनं टाकलेल्या गुगली चेंडूवर लिंडेचा फटका चुकला आणि तो झेलबाद झाला असता. पण, लाँग ऑनला उभ्या असलेल्या शरजीलला चेंडू दिसलाच नाही आणि तो पुढे धावत सुटला. चेंडू त्याच्या मागे पडला. नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज
पाहा व्हिडीओ..