India vs South Africa : भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील स्टार खेळाडू डेव्हिड मिलर ( David Miller) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या मुलीचं कॅन्सरमुळे निधन झाले. मिलरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून मुलीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावर त्याने लिहिले की, RIP माझी प्रिन्सेस. माझं खूप खूप प्रेम.
''स्कट, तूझी खूप आठवण येत राहील. तुझं मन खूपच मोठं होतं. तू आयुष्यात संघर्ष करत होतीस, परंतु तो संघर्षही तो सकारात्मकतेने पाहिलास आणि तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. तुझ्या या प्रवासात मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तू प्रेरणा होतीस. आयुष्यातील प्रत्येक क्षण कसा जगावा हे तू मला शिकवलेस. I Love You,''असे डेव्हिडने लिहिले.
डेव्हिड मिलर भारत दौऱ्यावर ट्वेंटी-२० व वन डे मालिका खेळण्यासाठी आला आहे. ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने १०६ धावांची खेळी केली होती आणि पहिल्या वन डेत त्याने नाबाद ७५ धावांची मॅच विनिंग खेळी केली. त्याच्या खेळाच्या जोरावर आफ्रिकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
डेव्हिड मिलरची कारकीर्द...डेव्हिड मिलरने १४७ वन डे व १०७ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने ४१.५४च्या सरासरीने ३६१४ धावा केल्या आहेत आणि त्यात ५ शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय ट्वेंटी-२०त त्याने २०६९ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर २ शतकं व ५ अर्धशतकं आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो गुजरात टायन्सकडून खेळतो.