दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू बुधवारी जोहान्सबर्ग येथे पोहोचले. भारताविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका रद्द झाल्यामुले आफ्रिकेच्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेताल. जगभरात कोरोना व्हायरस वाढता प्रभाव पाहता अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. त्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचाही समावेश होता. त्यामुळे आफ्रिकेचे खेळाडू मायदेशी परतले. पण, मायदेशात पोहचल्यावर त्यांना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन वन डे सामने खेळणार होता. धरमशाला येथे होणारा पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या शंभरहून अधिक झाली आणि बीसीसीआयनं ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. जगभरात आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी ८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
केट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. शौएब मांज्रा यांनी खेळाडूंना एकांतवासात जाण्याच्या आणि कोरोना व्हायरसच्या चाचणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. ''खेळाडूंना आम्ही काही दिवस इतरांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. किमान १४ दिवस त्यांनी एकांतवासात जावे. स्वतःला, इतरांना आणि कुटुंबीयांना सुरक्षित राखण्यासाठी हा योग्य पर्याय आहे.
या कालावधीत कोणातही कोरोनाची लक्षणं आढळल्यास आम्ही त्वरीत योग्य ते उपचार करू,'' असे मांज्रा यांनी सांगितले.''प्रवासादरम्यान आमच्या काही खेळाडूंनी मास्क वापरले होते. इतरांनी तसं न करण्याचा निर्णय घेतला. प्रवासातही आम्ही सर्वांपेक्षा वेगळेच होतो आणि लसीकरणही करून घेत होतो,''असेही त्यांनी सांगितले. मायदेशात परतण्यापूर्वी आफ्रिकेचे खेळाडू कोलकाता येथे थांबले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?
Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय
#OnThisDay : सचिन तेंडुलकर युगाचा अंत अन् टीम इंडियाला गवसला नवा स्टार
... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला