Join us  

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९९ विकेट्स घेणाऱ्या डेल स्टेनची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेन यानं मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 3:58 PM

Open in App

दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेन यानं मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ''ज्या खेळावर मी भरभरून प्रेम केलं, त्याच्यापासून अधिकृतपणे निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे,''असे ट्विट करून त्यानं ही निवृत्ती जाहीर केली. ( Dale Steyn has announced his retirement from all forms of the game). दक्षिण आफ्रिकेच्या या सुपरस्टार जलदगती गोलंदाजानं जगभरातील भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही ( IPL) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( RCB) संघाचा सदस्य होता.  डेल स्टेननं दक्षिण आफ्रिकेकडून ९३ कसोटी सामन्यांत ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. १२५ वन डे व ४७ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर १९६ व ६४ विकेट्स आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यानं ६१८ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्यानं ९५ सामन्यांत ९७ विकेट्स घेतल्या आहेत. स्टेननं २०१९मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मर्यादित षटकांच्या सामन्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला होता.

फेब्रुवारी २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळला होता. पण, मागील काही वर्ष त्याला दुखापतीमुळेच विश्रांती घ्यावी लागली. २०१६मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याचा खांदा दुखावला होता. डेल स्टेननं मागच्या वर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती, परंतु तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळला होता. ३ मार्च २०२१ला त्यानं कारकिर्दीतील अखेरची मॅच खेळली.  एबी डिव्हिलीयर्स, कागिसो रबाडा व केव्हीन पीटरसन यांच्यासह अनेकांनी स्टेनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :द. आफ्रिकाआयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएबी डिव्हिलियर्स
Open in App