Video : विकेटचं सेलिब्रेशन पडलं महागात, स्ट्रेचरवरून सोडावं लागलं मैदान; वर्ल्ड कपला मुकण्याचे संकेत

SA vs WI : दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज ( Keshav Maharaj) हा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची चिन्हे आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:06 AM2023-03-12T11:06:57+5:302023-03-12T11:07:13+5:30

whatsapp join usJoin us
South African spinner Keshav Maharaj injured himself while celebrating wicket during 2nd SA-WI Test, could miss ODI World Cup, Video  | Video : विकेटचं सेलिब्रेशन पडलं महागात, स्ट्रेचरवरून सोडावं लागलं मैदान; वर्ल्ड कपला मुकण्याचे संकेत

Video : विकेटचं सेलिब्रेशन पडलं महागात, स्ट्रेचरवरून सोडावं लागलं मैदान; वर्ल्ड कपला मुकण्याचे संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SA vs WI : दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज ( Keshav Maharaj) हा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची चिन्हे आहेत... ३३ वर्षीय फिरकीपटूला शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली. जोहान्सबर्ग येथे झालेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी केशव महाराजला दुखापत झाली. त्याने २.५ षटकांत चार धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायले मेयर्सच्या बाद होण्याचं सेलिब्रेशन करताना त्याला दुखापत झाली आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदान सोडावे लागले.  

महाराजाने याआधी आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे आणि या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहू शकतो. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील १९व्या षटकात महाराजने मेयर्ससाठी अपील केले. मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले, परंतु महाराजने DRS घेतला. त्यामध्ये मेयर्स बाद असल्याचा निर्णय आला अन् महाराज सेलिब्रेशन करण्यासाठी धावला. पण, तो अचानक मैदानावर बसला.  


दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी २८४ धावांनी जिंकली.  दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ३२० धावा केल्या आणि प्रत्युत्तार वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५१ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ३२१ धावा करून आफ्रिकेने तगडे लक्ष्य उभे केले, परंतु विंडिजला १०६ धावाच करता आल्या अन् आफ्रिकेने २८४ धावांनी ही मॅच जिंकली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: South African spinner Keshav Maharaj injured himself while celebrating wicket during 2nd SA-WI Test, could miss ODI World Cup, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.