Join us  

दक्षिण आफ्रिकेच्या पंचांचे आहे महाराष्ट्राशी नाते; जाणून घ्या...

पालेकर यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका रणजी सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. त्यांनी कृष्णम्माचारी श्रीनिवासन यांच्यासोबत मुंबई आणि मध्यप्रदेशातील लीग फेरीतील सामन्यात अम्पायरिंग केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 5:55 AM

Open in App

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे पंच अल्लाउद्दीन पालेकर यांनी भारताविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्यांच्या निर्णयांनी सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र अनेकांना माहीत नाही की, पालेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. पालेकर यांचे मूळ गाव शिव हे खेड तालुक्यात येते.

शिव गावचे सरपंच दुर्वेश पालेकर यांनी बुधवारी सांगितले की, मी देखील पालेकर आहे. अल्लाउद्दीन यांचे वडील नोकरी निमित्ताने दक्षिण आफ्रिकेला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. अल्लाउद्दीन यांचा जन्म देखील दक्षिण आफ्रिकेतच झाला आहे. मात्र त्यांचे मूळ गाव शिव आहे. त्यांच्यामुळे आमच्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे. आम्ही खूप खूश आहोत. ’ पालेकर यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका रणजी सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. त्यांनी कृष्णम्माचारी श्रीनिवासन यांच्यासोबत मुंबई आणि मध्यप्रदेशातील लीग फेरीतील सामन्यात अम्पायरिंग केले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App