केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत यजमान संघाला मोठा झटका बसला आहे. यजमान संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी झाल्याने पूर्ण मालिकेमधून बाहेर गेला आहे. स्टेनला शनिवारी गोलंदाजी करताना उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो आपले षटकही पूर्ण करु शकला नाही. लंगडतच त्यानं मैदान सोडलं. फिलंडरने शिल्लक तीन चेंडू टाकून षटक पूर्ण केलं. स्टेनच्या दुखापतीचे कारण शोधण्यासाठी पायाला स्कॅन केले गेले. त्यानंतर आलेला रिपोर्ट हा स्टेनसाठी चिंताजनक होता. हे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला संपूर्ण सिरीजमध्ये बाहेर बसावे लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून तो नुकताच सावरला होता.
( आणखी वाचा - धक्कादायक! कोहलीची विकेट लागली त्याच्या जिव्हारी, घेतले स्वत:ला पेटवून )
केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या खेळीच्या बळावर भारतानं सन्माजन धावसंख्या उभारली आहे. सध्या तिसऱ्या दिवसाचा खेळात पावसानं व्यत्यय आणला आहे. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यानंतर दिवसाखेर भारतीय फलंदाजांच्या हराकिरीमुळं भारत बॅकफूटवर ढकलला गेला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतानं सर्वबाद 209 धावा केल्या होत्या. तर दिवसाखेर आफ्रिकेनं दोन बाद 65 धावा केल्या. सध्या भारत 142 धावांनी पिछाडीवर आहे. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळ पावसामुळं उशीरा सुरु होण्याची शक्याता आहे. कदाचीत पावसामुळं भारतीय गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.
( आणखी वाचा : पहिल्या कसोटीपूर्वीच द. आफ्रिकेनं केला भारताचा अपमान, तुम्हालाही येईल राग )
भारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. याच दौ-यात भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे.
(आणखी वाचा : सनथ जयसूर्याची अवस्था वाईट, कुबड्यांशिवाय येत नाही चालता )
2017 सालात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघानं आपलं वर्चस्व कायम राखलं. कसोटी, वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत भारताने सरत्या वर्षाचा शेवटही गोड केला. गतवर्षी भारतानं 14 मालिकांसह 37 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र 2018 सालात भारतासमोर खडतरं आव्हान असणार आहेत. आगामी वर्षात भारताला बहुतांश सामने हे परदेशात खेळायचे आहेत. भारतामध्ये जशा खेळपट्टय़ा असतात तशा निश्चितच दक्षिण आफ्रिकेत मिळणार नाहीत, तेथील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी जास्त मिळते. या दौऱ्यात गोलंदाजीबरोबरच भारतीय फलंदाजांची खरी परीक्षा असणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौ-याची भारताची ही सातवी प्रदक्षिणा असेल. 1992 पासून भारतीय संघाला या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत.