नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे सर्व देशांच्या संघाची घोषणा केली जात आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आणि विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांच्या तगड्या १५ खेळाडूंना मैदानावर उतरवले आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेने देखील मंगळवारी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धुरा टेम्बा बवुमाकडे असणार आहे.
दरम्यान, संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख जवळ आली असून देखील अद्याप भारतीय संघ जाहीर झाला नाही. त्यामुळे लवकरच भारतीय संघाची देखील या स्पर्धेसाठी घोषणा होण्याची शक्यता आहे. आफ्रिकेच्या संघातून ट्रिस्टन स्टब्स विश्वचषकात पदार्पण करत आहे, तर रॅसी व्हॅन डर हुसेन दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार आहे.
टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -
टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, कगिसो रबाडा, अॅनरिक नॉर्तजे, रीझा हेंड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, प्रिटोरियस, रिल्ले रोसोउ, शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
Web Title: South Africa's T20 World Cup squad announced, Rassie van der Dussen misses out due to injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.