मुरली विजय - भारतीय कसोटी संघाचा शिलेदार मुरली विजयला किंग्स इलेव्हन पंजाबने तीन कोटी रुपये मोजून विकत घेतले होते. पण मुरली विजयने त्याच्या चाहत्यांची निराशा केली असून विजयने ११ सामन्यात २२ च्या सरासरीने फक्त २५१ धावा केल्या आहेत.
ट्रेंट बोल्ट - सनरायझर्स हैदराबादने ३.८ कोटी रुपयांमध्ये ट्रेंट बोल्ट या गोलंदाजाला संघात घेतले. पण बोल्टची कामगिरीही निराशाजनक ठरली असून त्याने ७ सामन्यांमध्ये नऊ विकेट घेतल्या आहेत.
अमित मिश्रा - भारतीय संघात संधीच्या प्रतिक्षेत असलेला फिरकी गोलंदाज अमित मिश्राचा आयपीएलमध्ये चांगलाच बोलबाला असतो. दिल्लीने अमित मिश्राला साडे तीन कोटी रुपये मोजून विकत घेतले होते. अमित मिश्राने १२ सामन्यंमध्ये फक्त नऊ विकेट घेतल्या आहेत.
अँजेलो मॅथ्यूज - दिल्ली डेअरडेव्हिल्सने ७.५ कोटी रुपये मोजून श्रीलंकेचा क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूजला विकत घेतले. सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत मॅथ्यूज तिस-या स्थानावर असल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण त्यांने ११ सामन्यांमध्ये फक्त १४४ धावा केल्या.
दिनेश कार्तिक - युवराजपाठोपाठ दिनेश कार्तिक हा यंदाच्या हंगामातील दुसरा क्रमांकाचा महागडा खेळाडू होता. बेंगळुरुने दिनेश कार्तिकला तब्बल १०.५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. दिनेशने १४ सामन्यांमध्ये १०५ धावाच केल्या.
आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला युवराज सिंग यंदाच्या पर्वात सपशेल अपयशी ठरला. १६ कोटी रुपये मोजून दिल्लीने युवराजला विकत घेतले असले तरी मैदानात युवराजची कामगिरी निराशाजनक होती. युवराजने १४ सामन्यांमध्ये १९.०७ च्या सरासरीने फक्त २४८ धावा केल्या. आयपीएलमधील महागड्या खेळाडूंच्या कामगिरीचा हा आढावा....