नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर २७२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. आज वन डे विश्वचषकात यजमान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सामना होत आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद २७२ धावा केल्या अन् भारताला सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी २७३ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.
सामन्यादरम्यान, विराट कोहली सहकारी खेळाडूंवर तापल्याचे दिसला. जसप्रीत बुमराहने राशिद खानला बाहेरचा रस्ता दाखवला आणि नवीन-उल-हक फलंदाजीसाठी आला. नवीनने येताच दोन धावा चोरल्या. त्याने मारलेला चेंडू विराटकडे गेला. विराटने वेगाने थ्रो करून देखील अफगाणिस्तानी खेळाडूला दोन धावा घेण्यात यश आल्याने विराट संतापला.
दरम्यान, नवीन फलंदाजीला आला तेव्हा चाहत्यांनी कोहली-कोहलीच्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. अफगाणिस्तानच्या खेळाडूसमोर प्रेक्षकांनी 'विराट' नारे दिले. खरं तर विराट आणि नवीन-उल-हक यांचा वाद जुना आहे. आयपीएल २०२३ मध्ये या वादाला सुरूवात झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या सामन्यादरम्यान जगाला हा वाद पाहायला मिळाला. तेव्हा दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती.
Web Title: Spectators chant Virat Kohli's name in front of Naveen Ul Haq in afg vs ind match in ICC odi world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.