Join us  

विश्वचषकातही 'नवीन' वाद! अफगाणिस्तानच्या खेळाडूची एन्ट्री अन् स्टेडियम विराटच्या नावाने दणाणले

ind vs afg live match : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २७२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 6:55 PM

Open in App

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर २७२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. आज वन डे विश्वचषकात यजमान भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सामना होत आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद २७२ धावा केल्या अन् भारताला सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी २७३ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. 

सामन्यादरम्यान, विराट कोहली सहकारी खेळाडूंवर तापल्याचे दिसला. जसप्रीत बुमराहने राशिद खानला बाहेरचा रस्ता दाखवला आणि नवीन-उल-हक फलंदाजीसाठी आला. नवीनने येताच दोन धावा चोरल्या. त्याने मारलेला चेंडू विराटकडे गेला. विराटने वेगाने थ्रो करून देखील अफगाणिस्तानी खेळाडूला दोन धावा घेण्यात यश आल्याने विराट संतापला.

दरम्यान, नवीन फलंदाजीला आला तेव्हा चाहत्यांनी कोहली-कोहलीच्या घोषणांनी मैदान दणाणून सोडले. अफगाणिस्तानच्या खेळाडूसमोर प्रेक्षकांनी 'विराट' नारे दिले. खरं तर विराट आणि नवीन-उल-हक यांचा वाद जुना आहे. आयपीएल २०२३ मध्ये या वादाला सुरूवात झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या सामन्यादरम्यान जगाला हा वाद पाहायला मिळाला. तेव्हा दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीअफगाणिस्तानभारतीय क्रिकेट संघ