बंगळुरू: सनरायझर्स हैदराबादवर काल १४ धावांनी मिळविलेल्या विजयासह सामन्यात आणखी एक चमत्कार घडला. सीमारेषेवर डिव्हिलियर्सने घेतलेला सुपरझेल पाहताना कर्णधार विराट कोहलीचाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. या कामगिरीची तुलना विराटने ‘स्पायडरमॅन’शी केली. कोहलीने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली. त्यात त्याने असे लिहिले की, मी आज स्पायडरमॅन पाहिला. स्पायडरमॅन जसा झटपट हालचाल करतो, तसाच झेल डिव्हिलियर्सने पकडला. अॅलेक्स हेल्सने मारलेला फटका षटकार होता. पण हवेत सूर मारून डिव्हिलियर्सने एका हाताने तो झेल टिपला.
सामन्यापेक्षा डिव्हिलियर्सच्या सुपर कॅचची अधिक चर्चा झाली. मैदानापासून १.१३ मीटर उंच उडी मारून त्याने एका हाताने तो झेल टिपला. आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील हा सर्वोत्तम झेलपैकी एक ठरला. हा झेल पाहून फिल्डिंगचा बादशाह जॉन्टी ºहोड्स हादेखील अवाक् झाला.
बंगळुरूच्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या अॅलेक्स हेल्सने पाय क्रिझ बाहेर काढून मोईन अलीचा चेंडू मैदानाबाहेर टोलवला. हा चेंडू उंचावरून जाताना हा झेल डिव्हिलियर्सने हवेतच अप्रतिमरीत्या टिपला. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने हवेत उंचावरून चेंडू टोलावल्यानंतर उंच उडी घेत एका हाताने झेल घेतला. यानंतर जॉन्टीने टिष्ट्वट केले, ‘काय झेल टिपलाय. एक वेडा माणूसच असा झेल घेऊ शकतो...’ इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने या झेलचे वर्णन ‘अविश्वसनीय माणसाने पकडलेला झेल’ असे केले.
स्वत: डिव्हिलियर्सने भारतातील स्वत:च्या लोकप्रियतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. फलंदाजीला आलो की, चाहते स्टेडियम दणाणून सोडतात, असे तो म्हणाला. माझे नाव लोकांच्या ओठांवर आलेले पाहून वेगळाच भाव उमटतो. मी गोलंदाजांवर दडपण आणून खेळण्याचा प्रयत्न करीत असतो.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Spiderman can take such a 'suppressed' spiderman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.