नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल १० गोलंदाजांमध्ये एकाही लेग स्पिनरचा समावेश नाही. पण ३० मेपासून ब्रिटनमध्ये सुरू होत असलेला क्रिकेट महाकुंभ याला अपवाद ठरू शकतो. कारण या वेळी मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणारे गोलंदाज विशेष छाप सोडण्यास सज्ज आहेत.
विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व १० संघांमध्ये केवळ विंडीजचा अपवाद वगळता सर्वच संघांत लेग स्पिनर असून भारतासारखे काही संघ मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाºया खेळाडूंच्या कामगिरीवर अधिक अवलंबून आहेत. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर चार वर्षांत सर्वाधिक बळी घेणाºया फिरकीपटूंमध्ये मनगटाच्या जोरावर मारा करणाºया फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आहे. या चार वर्षांत सर्वाधिक बळी घेणाºया अव्वल १० फिरकीपटूंमध्ये सात गोलंदाज मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणारे आहेत.
भारताने यंदा तीन स्पेशालिस्ट फिरकीपटूंची निवड केलेली आहे. त्यात कुलदीप व युझवेंद्र चहल लेग स्पिनर्स आहेत. रवींद्र जडेजा डावखुरा फिरकीपटू असून आॅफ स्पिनसाठी कर्णधार विराट कोहलीला कामचलाऊ फिरकीपटू केदार जाधववर अवलंबून राहावे लागेल. यजमान इंग्लंड आदिल राशिदवर अधिक अवलंबून आहे. आॅफ स्पिनर मोईन अली इंग्लंड संघात असलेला अन्य फिरकीपटू आहे.आॅस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी आॅफ स्पिनर नॅथन लियोन व लेग स्पिनर अॅडम झम्पा यांच्यावर राहील. ग्लेन मॅक्सवेल आपला पर्यायी गोलंदाज म्हणून आॅफ स्पिन माºयाने काही षटके करू शकतो.न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांमध्ये ईश सोढी लेग स्पिनर, तर मिशेल सँटनर डावखुरा फिरकीपटू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीची भिस्त इम्रान ताहिरवर अवलंबून राहील. तसेच तबरेज शम्सी हा चायनामन गोलंदाजही आपली छाप पाडण्यास उत्सुक आहे. पाकिस्तानकडे शादाब खानच्या रूपाने चांगला लेग स्पिनर आहे.
श्रीलंकेकडे दोन मुख्य फिरकीपटू जीवन मेंडिस व जेफ्री वंडारसे लेग स्पिनर आहेत. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची भिस्त बºयाच अंशी लेग स्पिनर राशिद खानवर अवलंबून असून तो त्यांचा प्रमुख खेळाडू आहे. तसेच रहमत शाह व शमीउल्लाह शिनवारी हेही लेग स्पिन मारा करू शकतात.बांगलादेश संघात शब्बीर रहमान लेग स्पिनर आहे, पण तो पर्यायी गोलंदाज आहे. त्यांच्या फिरकी विभागात शाकिबव्यतिरिक्त आॅफ स्पिनर महमुदुल्ला, मेहदी हसन आणि मोसादिक हुसेन यांचा समावेश आहे.