Join us  

बंगालच्या क्रिकेट संघातून खेळणार क्रीडा मंत्री; ३९ जणांच्या सराव शिबारात घेणार भाग! 

भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी ( State sports minister Manoj Tiwary)  हा सध्या बंगालचा क्रीडा मंत्री आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 4:45 PM

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी ( State sports minister Manoj Tiwary)  हा सध्या बंगालचा क्रीडा मंत्री आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशननं जाहीर केलेल्या ३९ संभाव्य खेळाडूंमध्ये मनोज तिवारी याचे नाव दिसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे सर्व खेळाडू फिटनेस कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यासोबत क्रीडा मंत्री मनोज तिवारीही असणार आहे. अनेक वर्षांपासून मनोज बंगाल क्रिकेट संघाकडून खेळतो आणि मधल्या फळीत त्यानं योगदान दिले आहे.  

India Tour of England : टीम इंडियाच्या विरोधात मैदानावर उतरले दोन भारतीय खेळाडू, रोहित शर्माची विकेट!

दुखापतीमुळे ३९ वर्षीय मनोजनं स्थानिक क्रिकेट खेळणं सोडलं होतं आणि २०२०मध्ये त्यानं सौराष्ट्रविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेची फायनल खेळली होती. आता तो पुन्हा स्थानिक क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशन २३ जुलैला फिटनेस कॅम्प घेणार आहे. मनोज तिवारीनं शिबपूर विभागातून तृणमुल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक जिंकली आहे. तो म्हणाला,मी अजुनही तंदुरुस्त आहे. पुढील गोष्टी कशा घडतील याची मी वाट पाहत आहे. पण, बंगालकडून आणखी काही सामने खेळण्यावाचून मी स्वतःला रोखू शकत नाही.''

बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहाशीष गांगुली यांनी सर्व खेळाडूंनी फिटनेस कॅम्पसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे आणि त्यांना असोसिएशननं ठरवलेल्या फिटनेस टेस्टमध्ये पास व्हावे लागेल. तिवारीसह ६ वर्षांनंतर लक्ष्मीरतन शुक्ला हाही कमबॅक करणार आहे. शुक्लानं २०१५साली राजकाणात प्रवेश केला. २०२१-२२ या पर्वात शुक्ला २३ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते.   

टॅग्स :पश्चिम बंगालभारतीय क्रिकेट संघ