कराची : पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने फलंदाज शार्जिल खान याच्यावर बुधवारी ५ वर्षांची बंदी घातली. यंदा फेब्रुवारीत झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
लाहोर हायकोर्टाचे माजी न्या. असगर हैदर यांच्या अध्यक्षतेखालील पाच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या पॅनलने शार्जिलला ही शिक्षा सुनावली.
शार्जिलवरील बंदी दोन टप्प्यांत असेल. यापैकी अडीच वर्षांत तो पीसीबीच्या देखरेखीत निलंबनाची शिक्षा भोगणार आहे. शार्जिलवरील बंदी यंदा १० फेब्रुवारीपासून अमलात आली. त्या वेळी पहिल्यांदा तो निलंबित झाला; शिवाय पाकचा एक अन्य खेळाडू खालिद लतिफसोबत स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात शार्जिलला दुबईहून परत पाठविले होते. आता २८ वर्षांचा शार्जिल दोन वर्षांनंतरच स्वत:चे करिअर सुरू करू शकेल. निर्णयानंतर आम्ही शिक्षेबद्दल समाधानी असल्याची प्रतिक्रिया शार्जिलच्या वकिलाने दिली. शार्जिल एक कसोटी, २५ वन डे आणि २५ टी-२० सामने खेळला आहे. (वृत्तसंस्था)
माजी मुख्य कोच वकार युनूस याने शार्जिलला पाकचा ‘वॉर्नर’ असे संबोधले होते. शार्जिलच्या पीएसएल स्पॉट फिक्सिंगबद्दल ऐकून वकारही कमालीचा नाराज झाला आहे.
Web Title: Spot-fixing: 5-year ban on Shah Razi, PCB anti corruption squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.